Gajanan Maharaj

Monday, May 25, 2020

Adyatmik Unnaticha Rajmarg Gajanan Maharaj Anubhav

श्री गजानन! अध्यात्मिक उन्नतीचा राजमार्ग 

आपल्या ह्या पोस्ट वर आपण सौ माधुरी ताम्हणे, ठाणे  ह्यांच्या गजानन महाराज  अनुभव वाचणार आहोत, शब्दांकन "श्री जयंत वेळणकर"     

आपल्या आयुष्यात घडणार्या विविध घटनाआपल्याला पडणारे अर्थपूर्ण स्वप्न. अशा काही गोष्टींचा आपल्याला कधी कधी अर्थबोध होत नाहीपण कालांतराने घडून गेलेल्या घटना क्रमाचा साकल्याने विचार केला की त्यामागील भगवंताची योजना पाहून थक्क व्हायला होतं.
मला वयाच्या अठराव्या वर्षी एक स्वप्न पडलंज्यात मी पाहिलं कीएक गणपतीचं देऊळ आहे त्यात लख्ख पांढरा प्रकाश पसरला आहे आणि त्यातुन एक भव्य शेंदरी रंगाची गणपतीची मूर्ती हळुहळु प्रकट होते आहे.
ते स्वप्न मला का पडलं ते मला समजलं नाही. मी ज्या कुटुंबात जन्मले तिथे असं काहीच वातावरण नव्हतं. माझे वडील नास्तिक होते. त्यांना पूजाअर्चा आवडायची नाही. आई कधीतरी नमस्कार करताना दिसायची. त्यामुळे त्या स्वप्नाची नोंद माझ्या मनात कुठे तरी झाली एवढंच!बाकी तेव्हा माझ्या जीवनातबाकी काही फरक झाला नाही.
मी माधुरी प्रधान ताम्हणे. १९५४ चा माझा जन्म. त्या स्वप्नानंतर कालांतराने हळु हळु गणपतीच्या भजना पूजनाची आवड मनात निर्माण होऊ लागली. इ.स.१९८४ ला माझं लग्न झालं. नंतरनेमकं कारण सांगता येणार नाही पण माझ्या जीवनात श्री गजानन महाराजांचा शुभंकर प्रवेश झाला. शेगांवच्या श्री गजानन महाराजांनी मला जणू शेगांवला खेचून घेतलं. मी नित्य नियमाने शेगांवला जाऊन अगदी पारायण मंडपात श्री गजानन विजय ग्रंथाचं पारायण करू लागले. माझ्या मनात श्री गजानन महाराजांविषयी आत्यंतिक भक्तीभाव जागृत झाला. मग मी अनेक वर्ष नियमित शेगांव वारी करीत राहिले.
पुढे मला महाराजांच्याच कृपेने दूरदर्शनवर काम करण्याची संधी चालून आली. तेव्हा मुंबई दूरदर्शनवर 'सुंदर माझं घर ' हॅलो सखी ' वगैरे कार्यक्रम महिलांमधे फार प्रिय होते. मला ते कार्यक्रम सादर करण्याची संधी चालून आली तेव्हा, 'हॅलो सखी ' कार्यक्रम दर सोमवारी होत असे. त्यातील दोन सोमवार माझ्याकडे व दोन अन्य एकी कडे होते.

श्री गजानन! जय गजानन! श्री गजानन! जय गजानन!

मला आठवते ती इ.स.दोन हजारच्या सुमारास झालेली माझी शेगांव वारी. आम्ही बरेच लोक शेगांवला पारायण मंडपात बसलो होतो. आमचं पारायण नुकतंच आटोपलं होतं. आम्ही अनेक लोक तिथे होतो. त्या संध्याकाळी एक पूर्ण अंध असलेले गृहस्थ तिथे आले. काठी टेकत टेकत ते त्या सर्वांमधून माझ्या जवळ आले. त्यांनी बंद मुठ माझ्या समोर धरली अन् मला म्हणाले ' कल बाजारसे तीन सिक्के लिए. दो दे दिए. एक तुम्हारे लिए रखा. ' त्यांनी मूठ उघडलीत्यांच्या मुठीत श्री गजानन महाराजांचं चांदीचं सुंदर नाणं होतं. ( जे आजही माझ्या पूजेत आहे) खडी साखरसाखर फुटाणे होते. ते सर्व माझ्या हातावर ठेवून त्यांनी माझ्या डोक्यावर थोपटलं व म्हणाले ' बेटा तेरा भला होगा !'
ते गृहस्थ दरवाज्याच्या दिशेने गेले. मी मुलांना त्यांच्या मागे पिटाळलं पण ते कुठे दिसले नाहीत. दुसरे दिवशी आम्ही परतीच्या प्रवासाला निघायचं म्हणून एक प्रकारे निरोप घेण्यासाठी म्हणून महाराजांच्या गादीजवळ गेले तर तिथून परत निघताना अचानक ते गृहस्थ पुन्हा माझ्या जवळ आलेपुन्हा डोक्यावर हात ठेवलाम्हणाले, ' सब ठीक होगा.'
आम्ही शेगांवहून परत आलो. मधे काही दिवस गेलेतमला दूरदर्शनवरील संबंधित अधिकार्यांनी बोलावलं. म्हणाले माधुरी मॅडम पुढील महिन्यात अमुक सोमवारी तुम्हाला एक कार्यक्रम तयार करायचा आहे. वास्तविक तो सोमवार तुमचा नसून त्या मॅडमचा आहे हे खरं आहे. पण त्यांना तो कार्यक्रम करणं शक्य नाहीम्हणून तुम्हा अध्यात्मिक उन्नतीचा राजमार्ग लाच तो करावा लागणार! कार्यक्रमाचं स्वरूप आहे ' प्रसिद्ध गणेश साधकगणेश साहित्याच्या गाढ्या अभ्यासकसौ संध्याताई अमृते यांची ओळख आपल्या सखींना करून देणे .गजानन महाराजांच्या कृपेने माझ्यासाठी नियतीनं लिहून ठेवलेला तो कार्यक्रम होता!
Adyatmik Unnaticha Rajmarg Gajanan Maharaj Anubhav
Shree Gajanan Jay Gajanan

त्या कार्यक्रमानं माझ्या जीवनात आमुलाग्र परिवर्तन घडवून आणलं. त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने माझी आदरणीय गुरू माऊलींशी ओळख झाली. एखाद्या साधकाची जीवनशैली काय असतेते मला जवळून अभ्यासता आलं. गुरूमंत्र व गुरू मार्गदर्शनातून गणेश उपासनेचा योग्य मार्ग मिळाला. पुढील काळात मुदगल पुराणगणेश गीता अशा गणेश ग्रंथांची असंख्य पारायणं झालीत.
इ.स.२०१०,२०११ च्या सुमारास एक दिवस सकाळी गणेशानं प्रेरणा दिली की डोंबिवली जवळ ' भोपर ' या गावी सेवेला जा! मी सकाळी तेथील मंदिरात पोहोचले. त्या दिवशीचा योग अगम्य होता. माझं स्वागत गणेश योगीनी सौ संध्याताई अमृतेगुरूमाऊलींनी केलं. म्हणाल्या मला मिळालेल्या प्रेरणेनुसार तुझ्या हातून एक कार्य घडणार आहे!
ते कार्य होतं गुरूमाऊलींचं चरित्र लेखन करण्याचं. त्यानंतर मी जवळपास नऊ वर्षे चरित्र लेखनाच्या कार्यात व्यस्त होते. या काळात गणेश ज्ञानाचे भांडार जणू माझ्यासाठी खुले झाले. एखादा साधक सातत्याने पंचवीस तीस वर्षे रात्री दोन वाजता उठून सूर्योदयापर्यंत साधनेत मग्न राहतोहे पाहून अध्यात्म मार्गावरील वाटसरू होण्याची प्रेरणा कुणाला मिळणार नाही?
या काळात दगडूशेठ बाप्पानी पण खूप अनुभव गाठीशी बांधून दिलेत.मुदगल पुराणाचं पारायण पूर्ण व्हावं आणि दगडूशेठ बाप्पासमोरील ताटातील प्रसाद प्राप्त व्हावा असा योग बरेचदा जुळून आला. या शिवाय अजून एक प्रकर्षानं लक्षात आलं कीएखाद्या विषयावर अभ्यास करण्याची प्रेरणा गणपती बाप्पानं किंवा गजानन महाराजांनी द्यावी आणि त्याच वेळेस ते साहित्य उपलब्ध करून देण्यात मदत पुरवावी. इतकंच नाही तर त्या साहित्याचा अभ्यास झाला की त्याच्याशी संबंधित दाखला गजानन विजय ग्रंथाच्या माध्यमातून समोर यावा. अर्थात 'गजानन विजय ' किंवा ' गजानन महाराज 'हा विषय घेऊन चिंतन करणार्या बहुतेकांना असा अनुभव येतच असतो. केवळ वानगी दाखल एक गोष्ट नमूद करते. पुणे येथील सौ. अर्चनाताई गावडे यांनाही गजानन विजय मधून वेगवेगळ्या विषयांवर प्रेरणा मिळून तो विषय मांडण्यासाठी महाराजांनी व्यासपीठही उपलब्ध करून दिलं. त्यांना प्रेरणा झाली ' हंस गीता 'विषयावर चिंतन करण्याचीत्याच वेळी ' हंस गीता ' उपलब्ध होण्याचीही प्रेरणा झाली. असो. आता पूर्वीपेक्षा व्यासंग वाढला. ज्ञानाच्या कक्षा किंचित रूंदावल्या आता गजानन विजयचं पारायण सुरू झालं की त्या प्रसंगाचं समग्र चिंतन करण्याचा प्रयत्न मन करू लागतं. उदाहरणार्थ ऊसानं महाराजांना मारण्याचा प्रसंग आला कीसाधकावर सामान्य जनांनी केलेला प्रहारतरीही साधकाची निश्चलता! हंस गीतेत उल्लेख आहे की , कुणी क्रोध दर्शविला अन् त्याला प्रतिसाद तपस्वी जेव्हा शांत चित्तानं देतोतेव्हा अशा तपस्वी साधकाचं दर्शन देवतांनाही आनंद देऊन जातं. महाराजांनी तर मुलांनी केलेल्या प्रहारानंतर त्यांना ऊसाचा रस काढून दिला.
अशा वेगवेगळ्या प्रसंगांच्या चिंतनातून मग मनात विचार येतात. महाराजांनी गोविंद बुवाला म्हटलं होतंगोविंदाजे जे जयाने सांगावे ते ते तयाने आचरावे. ' ते किती सार्थ आहे. महाराजांनी बाळाभाऊंना उपदेश करताना ' कृत्य प्रेमाविण असेल तर ते व्यर्थ. ' असं म्हटलं तेही साधार सिध्द झालं! असो. जो गजानन विजय ग्रंथ मला माहिती नव्हता त्याचा केवळ परिचय नाही तर तो वाचण्यातील अध्यात्मिक आनंद प्राप्त करून घेणं केवळ गजानन महाराजांच्या आशिर्वादाने शक्य झाले आहेहे त्रिवार सत्य आहे!
असो त्या दिवशी मी त्या गृहस्थांच्या रुपाने महाराजांचा आशिर्वाद घेऊन शेगांवहून निघाले तो एका गणेश कार्यात लिप्त झाले. किंबहुना महाराजांनी मला त्यात गुंतविले. मधील काळात शेगांव वारी झालीच नाही. तिकडे ते कार्य आटोपत आले आणि मला "श्रीगजानन अनुभव " पुस्तक वाचण्याचा योग आला. मी अक्षरशः झपाटल्या सारखं ते पुस्तकते महाराजांचे अनुभव वाचले आणि पुन्हा शेगांवकडे आकर्षित झाले.

"श्री" गजानन महाराज की जय

परवा असाच एकमहाराजांनी स्वप्नात दर्शन दिल्याचा अनुभव वाचून आतून तीव्रतेने महाराजांना म्हटलंमला खूप दिवसांनी तुम्ही शेगांवला परत आणलं आहे. मला नाही का दर्शन देणारत्याच रात्री स्वप्नात येऊन पारायण मंडपात महाराजांनी मला दर्शन दिलं!मी धन्य झाले!
आज घडून गेलेल्या त्या घटना क्रमाचा विचार करते तेव्हा लक्षात येतं. अकल्पित पणे पडलेलं गणेशाचं स्वप्न पुढे माझ्या हातून होणार्या कार्याचं सूचक होतं! ध्यानी मनी नसताना शेगांव आणि तेथील पारायण हे भक्ती मार्गावर पडलेलं पाऊल होतं! आंधळ्या गृहस्थांनी एकदा माझ्याकडे येणं योगायोग म्हणता आला असता. पण त्यांनी दोनदा दिलेला आशिर्वाद पुढील कार्याची योजना होती! त्यांनी गजानन महाराजांचं दिलेलं चांदीचं नाणं म्हणजे ' बाई तुझं आता येथे येणं होणार नाहीपण मी तुझ्या सोबत आहेयाचं सूचक होतं! वास्तविक दूरदर्शनवर गुरूमाऊलींचा कार्यक्रम माझ्या वाट्याला नव्हतातो माझ्या कडून करवून घेणंयात मला पडलेल्या स्वप्नाचा निश्चित संदर्भ होता! माझी शेगांव वारी आणि पारायण आशिर्वादासह खंडित करून मला 'गणेश कार्यातव्यस्त ठेवलं त्या काळात गणेश साहित्याचा व्यासंग घडवून गुरूमाऊलींचा आशिर्वाद मिळवून दिला! दगडूशेठ बाप्पाकडून अनुभव प्राप्त करवून प्रसाद मिळवून दिला आणि ते कार्य पूर्ण होताच "श्रीगजानन अनुभव " च्या माध्यमातून पुन्हा मला शेगांवला घेऊन आले
आता शेगांव वारी आणि पारायण पुनश्च नियमित सूरू झाले आहे. बराच काळ दूर ठेवूनही मात्र त्यांनी दर्शनाचा आणि वाचनाचा आनंद द्विगुणित करून दिला आहे. आता अंतर्मन ग्वाही देऊ लागलं आहे. ' बाई गं अध्यात्मात प्रगती करायची असेल तर गजानन महाराजांच्या चरणी लीन होऊन रहा. तोच अध्यात्मिक उन्नतीचा राजमार्ग आहे!अर्थात त्याचवेळी ते हेही सांगायला विसरत नाही की या मार्गावर चालायचं तर मुखात सतत नामस्मरण असणं गरजेचं आहे! तेव्हा म्हणत रहा.

गजानन महाराज अनुभव-अध्यात्मिक उन्नतीचा राजमार्ग

श्री गजानन! जय गजानन! श्री गजानन! जय गजानन!

🙏श्री गजानन महाराज की जय🙏
No comments:

Post a Comment