Posts

अध्यात्मिक उन्नतीचा राजमार्ग

Image
जय गजानन! आपल्या आयुष्यात घडणार्या विविध घटनाआपल्याला पडणारे अर्थपूर्ण स्वप्न. अशा काही गोष्टींचा आपल्याला कधी कधी अर्थबोध होत नाहीपण कालांतराने घडून गेलेल्या घटना क्रमाचा साकल्याने विचार केला की त्यामागील भगवंताची योजना पाहून थक्क व्हायला होतं.
मला वयाच्या अठराव्या वर्षी एक स्वप्न पडलंज्यात मी पाहिलं कीएक गणपतीचं देऊळ आहे त्यात लख्ख पांढरा प्रकाश पसरला आहे आणि त्यातुन एक भव्य शेंदरी रंगाची गणपतीची मूर्ती हळुहळु प्रकट होते आहे. ते स्वप्न मला का पडलं ते मला समजलं नाही. मी ज्या कुटुंबात जन्मले तिथे असं काहीच वातावरण नव्हतं. माझे वडील नास्तिक होते. त्यांना पूजाअर्चा आवडायची नाही. आई कधीतरी नमस्कार करताना दिसायची. त्यामुळे त्या स्वप्नाची नोंद माझ्या मनात कुठे तरी झाली एवढंच!बाकी तेव्हा माझ्या जीवनातबाकी काही फरक झाला नाही. मी माधुरी प्रधान ताम्हणे. १९५४ चा माझा जन्म. त्या स्वप्नानंतर कालांतराने हळु हळु गणपतीच्या भजना पूजनाची आवड मनात निर्माण होऊ लागली. इ.स.१९८४ ला माझं लग्न झालं. नंतरनेमकं कारण सांगता येणार नाही पण माझ्या जीवनात श्री गजानन महाराजांचा शुभंकर प्रवेश झाला. शेगांवच्य…

अचिंत्य जगताप्रती कृती तुझी न कोणा कळे

Image
जय गजानन! मी चित्ररेखा धानकुटे, वर्धा. निवृत्त शालेय शिक्षिका. मी गजानन महाराजांचं खूप काही करीत असते असं खरं तर काही नाही. गुरूपौर्णिमा, प्रकट दिन, ऋषीपंचमी या निमित्ताने गजानन विजय ग्रंथाचं पारायण आणि आमचं लग्न झाल्यानंतर लगेच आई आम्हा उभयतांना शेगांवला घेऊन गेली होती तिथे तिने मला घेऊन दिलेल्या गजानन महाराजांच्या लहान पोथीचे नित्य वाचन, एवढं काय ते करायचं! हां, एक मात्र निश्चित की आयुष्यात जिथे कुठे संभ्रम निर्माण झाला, तिथे गजानन महाराजांचं मी स्मरण केलं आणि त्यांच्या नामाचा मला आधार मिळाला असं नेहमीच होत आलं. हे सहाय्य मिळण्याचं कारण माझ्या आयुष्यात इ.स.१९६४ साली घडलेली एक घटना, जी माझ्या मनावर खोलवर कोरली आहे ती असावी असं मला वाटतं. त्यावेळी मी जेमतेम आठ वर्षांची होते व माझा लहान भाऊ अविनाश पाच वर्षांचा! आमची एक आत्या होती ( वडिलांची मावस बहीण) तिच्या मुलीचा एक पाय जन्मतःच वाकडा होता. तिला उभं केलं तर उभं राहता येत नव्हतं. बरं घरची परिस्थिती म्हणाल तर आत्याचे मिस्टर जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक! म्हणजे पगार अत्यल्प. त्यातून बाहेर गावी नोकरी म्हणजे खर्च जास्त. डाॅक्टरांनी ऑपरेशन …